। अलिबाग । वार्ताहर ।
रामनाथ येथे गावदेवी चषक 2022 चे आयोजन रविवार (दि.10) रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये डे नाईट सर्क अंडरआर्म टेनिस क्रिकेटचे सामने खेळविण्यात येणार आहेत. ही स्पर्धा अलिबाग येथील रामनाथ मैदान, गर्गवरद बिल्डिंग समोर भरविण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 25 हजार रूपये व चषक तर द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार रूपये व चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर यांस आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेची फी 2500 रूपये असणार आहे. या स्पर्धेत प्रथम येणार्या 16 संघांना प्रवेश दिला जाणार आहेत. तसेच सामने रविवारी दुपारी 3 वाजता सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक संघात 9 खेळाडू पाहिजेत व सामन्यात अंतिम निर्णय हा पंचांचा राहणार आहे. तसेच या स्पर्धेमध्ये अलिबाग पोलीस ठाणे विरूद्ध गावदेवी रामनाथ 40 प्लस हा प्रेक्षणीस सामना ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सौरभ पालवणकर 9768601043, विराज चौलकर 8956129256, रितेश गुरव 9923555157 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.