कंटेनरची कारला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

। पुणे । प्रतिनिधी ।

पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात बुधवारी (दि.21) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला. पुण्यातील चार मित्र अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले होते. दरम्यान, वाखरीजवळ त्यांची गाडी गरम झाल्याने त्यांनी गाडी बाजूला उभी केली होती. त्यातील एका मित्राने एक भरधाव कंटेनर त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहिले आणि त्याने उडी मारली. कंटेनरने कारला जोरदार धडक दिली आणि कारसह तिघांना फरफटत नेले. यात रोहित पोकळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

घटनेतील कंटेनरचालक प्रदीप माने हा दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कंटेनरचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Exit mobile version