। बुलढाणा । प्रतिनिधी ।
बुलढाण्यात कंटेनरने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या धडकेत तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
मंगळवारी (दि. 29) सकाळी पंधरा मजूर घेऊन एक ट्रॅक्टर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होता. यावेळी वेगाने येणाऱ्या कंटेनरने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा उपचारासाठी रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर, चार मजूर गंभीर जखमी झाले असून इतर मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.