| वावोशी । वार्ताहर ।
पेण खोपोली मार्गावरील वावोशी फाट्याच्या अलीकडील मुख्य वळणावर ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाला. या अपघातामध्ये ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला असून कंटेनर ज्या ठिकाणी पलटी झाला त्या ठिकाणी काही अंतरावरच दुकाने, पादचारी, आणि वाहनांची वर्दळ असते. परंतू कोणतीही दुर्घटना न घडल्याने होणारा फार मोठा अनर्थ टळला आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सुर्वे, पोलीस नाईक आबासाहेब गेंड आदी करीत आहेत.