। नेरळ । प्रतिनिधी ।
पळसदरी ग्रामपंचायतीतील ठाकूरवाडीमध्ये शंभरहून अधिक घरे असून त्यांच्यासाठी जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना राबविली जात आहे. या नळपाणी योजनेची विहीर रेल्वे बंधाराच्या जलाशयाच्या पाण्यावर बांधण्यात आली आहे. ही विहिरी बांधताना संबंधित ठेकेदाराने सुरू ठेवलेले बांधकाम आणि त्यानंतर विहिरीची स्वच्छता न करता विहिरीतून थेट पाण्याचा पुरवठा ग्रामस्थांना करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच तेथील तलावातील पाणी थेट विहिरीत जात असल्याने पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना आता दूषित पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.






