| खोपोली | प्रतिनिधी |
शास्त्री नगर चौकात दोन मजली सभागृह आणि गाळ्याचे काम सुरू आहे. याठिकाणी तिसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड आणि बांधकाम सुरू असताना सुरक्षा जाळी नसल्यामुळे सिमेंट रेतीचा माल खाली रस्त्यावर पडत आहे. शनिवारी दुपारच्या दरम्यान सिमेंट रेतीचा माल खाली उभी असलेल्या चार चाकी वाहनावर पडला. परंतु, सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नसले तरी विटा किंवा जड वस्तू खाली पडून रस्त्यावरून चालणारे नागरिक, वाहन चालकांना गंभीर दुखापत होण्याची संभवना नागरिक व्यक्त करीत आहेत. भर चौकात सुरक्षेच्या अभावी होणाऱ्या अपघातांसाठी जबाबदार असणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणा, खोपोली नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. शास्त्री नगर येथील जुना सभागृह तोडून याठिकाणी नगरपालिका दोन मजली इमारत बांधण्याचं काम सुरू आहे. तिसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड आणि बांधकाम सुरू आहे. याठिकाणी सुरक्षा जाळी नाही, जबाबदार व्यक्ती उभी नसून नाका काम कामगारांच्या माध्यमातून काम सुरू असून कोणाचं काम सुरू आहे. त्या नाका कामगारांना माहितीच नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी सुरक्षा जाळी न लावणे हे नागरिक आणि कामगारांच्या जिवाशी खेळणारे असून, यामुळे पडून होणारे अपघात आणि साहित्यामुळे जीवितहानीचा गंभीर धोका निर्माण होवू शकतो त्यामुळे अशा बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
बांधकाम करताना ठेकेदाराचा निष्काळजीपणा
