कंत्राटी मुख्यमंत्रीही पर्मनंट होतील; गोगावलेंचा ठाकरेंवर पलटवार

। मुंबई । प्रतिनिधी ।

कंत्राटी लोकही पुढे जाऊन कायमस्वरूपी होतात. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पण कायमस्वरुपी होतील, असा टोला शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कंत्राटी मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. त्याला शिंदे गटातील आ. गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही आज जी घोषणाबाजी केली, ती त्यांच्या चांगलीच वर्मी लागली. आम्हाला कोणी काही विचारते का, याची आम्ही वाट पाहत होतो. पण कोणी काही विचारलं नाही. प्रत्येकाने आपली मर्यादा राखली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

आम्हाला डिवचू नका. आम्ही काही करणार नाही. पण तुम्ही अंगावर आलात, तर आम्ही हात बांधून बसणार का?

भरत गोगावले, प्रतोद
Exit mobile version