रसायनीतील तरुणांकडून श्रमदान

। रसायनी । वार्ताहर ।
दांड-रसायनी रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच या रस्त्यावरून येण्या जाणार्‍या वाहनांतून नागरिकांना प्रवास करणे कठीण होत आहे. यातच वाहनांचे स्पेअर पार्ट निकामी होणे, नागरिकांना कंबर व पाठदुखी त्रास होणे, दररोज छोटे-मोठे अपघात होणे आदी समस्या सुरुच आहेत. दांड -रसायनी रस्त्यावरील मोहोपाडा हे मुख्य स्थळ असल्याने येथील रस्त्यालाच भलेमोठे खड्डे पडल्याने शाळेतील मुलांना-महिलांना येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

रस्त्याच्या या झालेल्या गंभीर परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कानाडोळा करत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. यासाठी राकेश खराडे यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात घेत तसेच रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी लक्ष वेधले. त्यांनी केदार शिंदे व इतर लोकप्रतिनीधींशी संवाद साधला. यावेळी सदरील नागरिकांनी वैयक्तिक दखल घेत व सामाजिक बांधिलकी जपत श्रमदान करीत खड्ड्यांची डागडुजी केली. या रस्त्याचे खंडार झालेले खड्डे बुजवण्यात आले. तसेच यावेळी कोणत्याही वाहन चालकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये याची दक्षता वाहतूक पोलीस सताने, पाटील, देशमुख यांनी घेतली. यावेळी मनीष पाटील, सोहम शिंदे, अक्षय पाटील, विशाल मुरकुटे, गणेश पाटील, अलंकार भोईर, अजित पाटील, कौशल खाने, नंदकुमार पाटील यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version