बांगलादेश लढाईमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचे योगदान

ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे प्रतिपादन
मुंबई | प्रतिनिधी |
1971 च्या बांगलादेशच्या लढाईमध्ये 7 मराठा लाईट इन्फन्ट्रीचे मोठे योगदान होते. यामधील जवानांनी पाचागड आणि कांतानगर या बांगलादेशमधील भागात हल्ले करून पाकिस्तानी सैन्याला पुरते नमवले होते. मात्र त्यासाठी इन्फन्ट्रीने 31 जवानांना गमावले. 125 जवान गंभीर गंभीर जखमी झाले. अर्ध्याहून अधिक जवान जखमी होऊही त्यांनी लढाई केली होती. 3 डिसेंबर 1971 ते 16 डिसेंबर 1971 या दरम्यान ते युद्ध झाले आणि या युद्धाला पन्नास वर्षे होत आहेत. त्यामुळे हा एक अतिशय महत्त्वाचा क्षण आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी एका ऑनलाइन संवादात बोलताना सांगितले.
आयोजित केलेल्या या ऑनलाईन संवादामध्ये त्यांनी या युद्धात सहभागी झालेल्या त्यावेळच्या जवान आणि अधिकार्‍यांशी संवाद साधून युद्धातील आठवणींना जागे केले. यामध्ये त्यांनी ऑनररी कॅप्टन आणि सुभेदार मेजर जयराम मुळीक, ऑनररी कॅप्टन आणि सुभेदार मेजर दयानंद मांढरे, ऑनररी कॅप्टन आणि सुभेदार मेजर विजयकुमार मोरे यांच्यासोबत संवाद साधला.
या युद्धात सात मराठा लाइट इन्फन्ट्रीने जे जवान गमावले म्हणजेच ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देशासाठी दिले त्यात हवालदार मनोहर राणे, पेडलान्सनाईक परशुराम रेवंडकर, शिपाई शंकर माने, पेडलान्सनाईक गणपत पार्चे, शिपाई बनसोडे, बाबू इंगळे आणि रमेश जगनाडे, तुकाराम करांडे आणि बलवान नरके, सुभेदार दौलतराव फडतरे, हवालदार बळीराम विचारे, लान्स हवालदार रामकृष्ण बोरलीकर, पेडलान्सनाईक आशाराम तानपुरे, शिपाई हनुमान कोलपे, शिवाजी जगदाळे, गणपत सकपाळ, विठ्ठल शिरसाट, अंकुश तारी, मनप्पा चव्हाण, रामचंद्र देसाई, रघुनाथ सावंत, व्यंकटराव देशमुख, महादेव परब, रमेश इंगवले, बाळकृष्ण जाधव, विजय कोतवाल यांचा समावेश आहे.
यावेळी ऑनररी कॅप्टन आणि सुभेदार मेजर विजयकुमार मोर, सुभेदार मेजर दयानंद मांढरे,सुभेदार मेजर जयराम मुळीक आदींनी आपले अनुभव कथन केले.
डॉक्टर तांबे देवदूतच वाटायचे
युद्धात डॉक्टर कॅप्टन तांबे हे आम्हाला देवदूतच वाटत, त्याबद्दल विजयकुमार मोरे यांनी सांगितले की, ते जखमी सैनिकांवर उपचार करीत, अगदी प्रत्यक्षा युद्धाच्या ठिकामी जाऊन, आघाडीवर जातून वैद्यकीय स्टाफला नेत त्यांनी जखमी कैद्यांवर उपचार केले होते. त्यांच्यामुळे ाम्हाला खूप धीर येत असे.

Exit mobile version