पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे : पंडित पाटील

बोर्लीमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
कोर्लई | वार्ताहर |
बोर्ली पंचक्रोशीतील सर्व सामान्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन आज बोर्ली येथे शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून पक्षवाढीसाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पंडित पाटील यांनी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी शे.का.पक्ष तालुका चिटणीस मनोज भगत, सहचिटणीस सी.एम.ठाकूर, पंचायत समितीचे माजी सभापती रमेश नागांवकर, अजित कासार, पुरोगामी युवा संघटनेचे शरद चवरकर,प्रिती नलावडे,भारती बंदरी, रिझवान फहिम, बशीर गोरमे, ग्रामपंचायत सरपंच चेतन जावसेन (बोर्ली),मनीष नांदगावकर (उसरोली), काशिनाथ वाघमारे (भोईघर), संतोष कांबळी,गणेश टावरे, गणेश वाघमारे, मनोहर भोपी,प्रसाद चौलकर, विनायक चोगले, दिपक पाटील, रमेश दिवेकर,प्रताप नलावडे,स्वरुप ठाकूर, प्रदिप धनावडे, काशिनाथ मोहिते, प्रशांत नागोजी, शशिकांत पारवे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरपंच चेतन जावसेन, उपसरपंच मतीन सौदागर व सी.एम.ठाकूर यांच्या हस्ते पंडित पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन,त्यांचे मार्गदर्शन घेऊन युवा कार्यकर्त्यांनी भावी वाटचाल करावी.असे त्यांनी सांगितले.यावेळी मनोज भगत, रमेश नागांवकर,सी.एम.ठाकूर, मनीष नांदगावकर, चेतन जावसेन, रिझवान फहिम आदींनी आपले विचार मांडले.शेवटी सरपंच चेतन जावसेन यांनी आभार मानले.

Exit mobile version