जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची उचलबांगडी; आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

डॉ. महेंद्र कल्याणकर नवे जिल्हाधिकारी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगडच्या वादग्रस्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रायगडातील दरड दुर्घटना दरम्यान जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जबाबदारपणे परिस्थिती हाताळली नसल्याचा आरोप करीत राज्य शासनाने कारवाई करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शासनाकडे केली होती.

तसेच त्यांच्या कारभारावर कृषीवलने मोठया प्रमाणावर टिका केली होती. त्यामुळे कार्यकाळ पुर्ण होण्यापूर्वीच निधी चौधरी यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. निधी चौधरी यांची नियुक्ती मुंबईतील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी करण्यात आली आहे.

Exit mobile version