हिरवळ महाविद्यालयात दीक्षान्त समारंभ

। माणगाव । वार्ताहर ।
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, महाड येथे शनिवार 30 एप्रिल रोजी शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या विद्यार्थ्यांचा दीक्षान्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य सुदेश कदम यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांना महाविद्यालयाची व महाविद्यालयातील राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर भाई धारिया यांनी सर्व पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांचा उज्वल भविष्यासाठी शुभेछ्या दिल्या.या कार्यक्रमासाठी संजय घवघवे, सोनाली धारिया, डॉ. संध्या कुलकर्णी, संतोष बुटाला, वासंती रजाप्पण यांची उपस्थिती लाभली.सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version