| माणगाव । वार्ताहर ।
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यातून स्फूर्ती देण्यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, महाड व हिरवळ रात्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, व महिला विकास कक्ष विभागातर्फे शुक्रवारी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनी ईशा पार्टे हिने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवकार्यावर ओवी सादर केली.
यानंतर विद्यार्थ्यांनी धारिया पेट्रोल पंप चांभारखिंड व छत्रपती शिवाजी महाराज चौक , महाड येथे पथनाट्य सादरीकरण करून समाजात जनजागृती केली. यावेळी किशोर धारिया,सोनाली धारिया डॉ. संध्या कुलकर्णी यांच्या प्रोत्साहनाने विविध विषयावर जनजागृती करण्याकरिता महाविद्यालयाचे सुदेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते