| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल सायन महामार्गावरील नेरुळ येथील उड्डाणपुलाच्या कॉक्रीटीकरणाच्या उड्डाणपुलाचे काम मागील आठवड्यापासून ते 15 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार असल्यामुळे त्यामुळे नवी मुंबईतून जाणार्या महामार्गावरील वाहतूककोंडीला नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याच महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे कोंडी कमी करण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने कारचालकांना वाशी येथून पामबीच मार्गावरुन सीबीडीला जाण्याची अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे आता सायन पनवेल महामार्गावरील अनेक वाहने पामबीच मार्गावर येत असल्याने पामबीच मार्गावरही वाहनांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे या वेगवान मार्गाचा वेग मंदावला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई व लगतच्या सर्व महापालिकाक्षेत्रात वाहनांची संख्या सातत्याने वाढत असून महाराष्ट्र राज्य शासनामार्फत मेट्रो,मोने रेल्वे तसेच हजारे उड्डाणपुल निर्मितीकरुन वाहतूककोंडीतून नागरीकांची सुटका करण्यासाठी करोडो खर्चातून प्रकल्प उभारले जात असताना रस्त्यावरील वाहतूक व सातत्याने वाढणारी वाहतूक कोंडी फुटता फटत नाही. सायन पनवेल महामार्गावर नेरुळ तसेच पुढे कळंबोली जवळील महामार्गावरील रस्त्यांच्या कॉक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहनचालकांना काही मिनिटांच्या प्रवासाकरीता अनेक तासांच्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. नवी मुंबई शहरातील पामबीच मार्ग हा शहरातील अंतर्गत वाहतूक शहराबाहेरील मार्गाने वळवण्यासाठी केली आहे. परतू या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.