हिरवळ महाविद्यालयात दीक्षांत समारंभ

। माणगाव । प्रतिनिधी ।

हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स (सीएसआयटी ) व हिरवळ रात्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील विद्यार्थ्यांचा ‘दीक्षांत समारंभ’ शनिवारी (दि.20)आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे सेक्रेटरी संतोष बुटाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने व त्यानंतर सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी दीक्षांत समारंभ आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले. पुढील पिढी घडविण्यात शिक्षणाची भूमिका किती महत्वाची आहे यावर मत व्यक्त केले. तसेच, विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मला सार्थ अभिमान आहे, असे यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा असे आवाहन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version