। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरात नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेला महिलांसाठी पाककला लाडू स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 28 स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेबरोबर महिलांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले होते.
माथेरान शहरातील राजाराम साळुंखे रोड येथील नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने कोजागिरी पौर्णिमा निमित्त महिलांसाठी विविध खेळ आणि पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी पाककला स्पर्धेत माथेरान शहरातील 28 महिलांनी लाडू पदार्थ संबंधित विविध पाककृती स्पर्धेसाठी मांडल्या होत्या. या सर्व पाककृतींचे परीक्षण पूनम सकपाळ आणि लविना सांकला यांनी केले. यात डिंक, ड्रायफ्रूट, नाचणी हलीम, मेथी, बाजरी, चुरमा, रवा, बेसन, खोबरं आदी अनेक प्रकारचे पौष्टिक, लो कॅलरी, फायबर युक्त लाडू या स्पर्धेत ठेवण्यात आले होते.
पाक कला लाडू स्पर्धेत प्रथम क्रमांक उडीद डाळीचे लाडू, द्वितीय क्रमांक विविध प्रकारच्या बियांपासून बनवलेले लाडू, तसेच तृतीय क्रमांक पान लाडू आणि चौथ्या क्रमांकाची चार बक्षीसे देण्यात आली.