। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी अलिबागच्या शतक महोत्सवानिमित्त रायगड जिल्हा परिषद शाळा कुरूळ, ता. अलिबाग येथे गुरुवारी (दि.11) पाककला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात पतपेढीच्या सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
या स्पर्धांमध्ये विविध पौष्टिक पदार्थांची मांडणी करण्यात आली. तसेच रांगोळी स्पर्धेसाठी ‘माझी वसुंधरा’ या विषयावर आधारित रंगछटा साकारण्यात आल्या. पाककलेमध्ये प्रथम क्रमांक सुलभा ठोंबरे यांनी, तर द्वितीय क्रमांक समिक्षा संजिर पाटील यांनी पटकावला. तसेच, रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक रेखा मलाबदे तर द्वितीय क्रमांक मनिषा अंजर्लेकर यांनी पटकावला.
या कार्यक्रमासाठी अलिबाग तालुका गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, अलिबाग तालुका शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा पिंगळा, नरेंद्र गुरव, नितीन पाटील, दीपक पाटील, निलेश तुरे, विनोद कवळे, प्रतिभा पाटील, रेश्मा धुमाळ, प्रमोद भोपी, राजेंद्र पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रमोद भोपी व इतर संचालक यांनी मेहनत घेतली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संचालिका रेश्मा धुमाळ, रविंद्र थळे तसेच सुरेखा नित्यनाथ म्हात्रे यांनी उत्तम कामगिरी बजावली. यावेळी देविदास थळे, महेश बलकवडे, अजय नाईक, महेंद्र गुरव तसेच महिला शिक्षक भगिनी उपस्थित होत्या.







