खालापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात कोरानाचा शिरकाव

। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीत कोरोना रुग्ण शून्यावर आले असतानाच शुक्रवारी खालापूरात खळबळजनक माहिती समोर आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणार्‍या उपविभाग पोलीस कार्यालयात गुरवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हे कार्यालय बंद करण्यात आले आहे. तर अधिकृत माहिती मिळवण्यासाठी कार्यालयात दूरध्वनी केला असता दूरध्वनी संपर्क होऊ शकला नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.निमिष धेंडे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, बुधवारी खालापूर विभागीय पोलीस कार्यालयात दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळण्याची माहिती मिळाली होती. हे दोन कर्मचारी खाजगी तपासणी केंद्रात तपासणी करून आल्याने त्यांची व इतर पोलीस कर्मचारी यांची पुन्हा खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांनी खालापूर पोलीस विभागीय कार्यालयात सर्वांच पोलीस कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.

Exit mobile version