| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतील नाईक नगर येथे राहणाऱ्या रहिवाशांमध्ये शुक्रवारी (दि.18) गणेशोत्सवाच्या काळात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेसंदर्भात उरण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे उरण तालुक्यात अशाप्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे.
उरण तालुक्यात औद्योगिकीकरण व नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या तालुक्यात रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक ये-जा करत आहेत. सदर परप्रांतीय नागरिक आपल्या उपजीविकेसाठी अवैध धंदे करत असून, त्यांना पाठबळ हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी व स्थानिक प्रशासन तथा पोलीस यंत्रणा देत असल्याने गुन्हे गारी प्रवृत्तीच्या इसमांची संख्या वाढत चालली आहे. नुकताच द्रोणागिरी नोडमध्ये खरकटं अंगावर फेकलं याचा जाब विचारल्याने परप्रांतीयाकडून स्थानिकांवर हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. 9) घडली होती. त्यानंतर म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतील नाईक नगर येथे राहणाऱ्या रहिवाशांमध्ये शुक्रवारी (दि.18) गणेशोत्सवाच्या काळात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीमध्ये पुरुषांबरोबर महिला ही गंभीर जखमी झाल्या. या घटनेसंदर्भात उरण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र, वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे उरण तालुक्यात अशाप्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, उरण तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. तरी, ही परिस्थिती बदलण्यासाठी पोलीस यंत्रणेमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप रोखणे गरजेचे असून, कायदे बदलून पोलीस दलाला आधुनिक शस्त्रास्त्रे, वाहने आणि तंत्रज्ञान पुरवणे आवश्यक आहे. तसेच पोलीस ठाण्यातील रिक्त पदे तातडीने भरली पाहिजेत.जलद न्यायव्यवस्था: प्रलंबित खटले जलदगती न्यायालयात चालवून गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा दिली पाहिजे. नाहीतर तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दिशेने वळला जाईल, अशी भीती सुज्ञ नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.






