रायगड जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे 601 नवे रुग्ण

6 रुग्णांचा मृत्यू; 438 रुग्ण कोरोनामुक्त

अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात आज रविवारी 27 जून रोजी कोरोनाच्या 601 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 6 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 438 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
 
आज पनवेल शहरात 107, पनवेल ग्रामीणमध्ये 55, अलिबागमध्ये 90, खालापूरमध्ये 45, उरणमध्ये 19, पेणमध्ये 81, महाडमध्ये 45, कर्जतमध्ये 8, रोह्यात 32, मुरुडमध्ये 16, माणगावमध्ये 50, म्हसळ्यात 5, सुधागडमध्ये 19, श्रीवर्धनमध्ये 16, पोलादपूरमध्ये 8 तर तळ्यामध्ये 5 अशा रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
 
आता पर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजार 166 झाली आहे. यापैकी 1 लाख 36 हजार 379 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 3 हजार 549 वर गेला आहे. सद्यस्थितीत 6 हजार 238 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version