। मुंबई । प्रतिनिधी ।
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सध्या तरी राज्यामध्ये मास्कमुक्तीचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. कोरोना निर्बंधाबाबत राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. युरोपात, चीनमध्ये, साऊथ कोरियात वाढणारी संख्या पाहता सतर्कता बाळगावी लागेल. त्यामुळे तुर्त पूर्णपणे मास्क मुक्तीचा विचार केलेला नाही.. कोरोना अनुषंगिक धोरण आपण सर्वांनीच पाळलं पाहिजे. जे निर्बंध लावले होते ते बर्याच अंशी संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. जे जुजबी स्वरुपाचे नियम उरले आहेत, ते यासाठी ठेवले गेलेत कारण लसीकरणाचे प्रमाण अजून वाढावं, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.