सुधागड तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात मागील अनेक दिवस कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र 3 जानेवारी रोजी दोन कोरोना बाधित रुग्ण तर 5 जानेवारी रोजी एक कोरोना रुग्ण सापडला आहे. अशी माहिती तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी दिली. तसेच नागरिकांनी खबरदारी आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाने सुधागड तालुक्यात अक्षरशः थैमान घातले होते. पुन्हा जर कोव्हिड फोफावला तर जगणे मुश्किल होईल अशा प्रतिक्रिया सामान्य जनता व्यक्त करीत आहे. तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 1731 रुग्ण झाले असून 1648 रुग्ण बरे झाले आहेत. आणि 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्याने सर्व नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून योग्य खबरदारी व काळजी घ्यावी. घाबरून जाऊ नये असे आवाहन यांनी तहसीलदार रायण्णावार यांना केले आहे.

Exit mobile version