। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील कोरोना मृतांची संख्या शुक्रवारी 202 वर जाऊन पोहचली आहे.तालुक्यात आजपर्यंत 6674 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 202 जण मृत झाले असल्याने तालुक्याचा कोरोना मृत्यूदर तीन टक्क्यांवर पोहचला आहे.
कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल रोह्याच्या सुपुत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये समाविष्ट होत असताना रोहा तालुक्याचा कोरोना मृत्युदर निश्चितच चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील 5973 जणांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.