केरळमध्ये कोरोना बळावला

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत 12 हजारांची वाढ झाली. एकट्या केरळमध्ये 24 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. कोरोनाला रोखण्यात सुरुवातीला यशस्वी झालेल्या केरळमध्ये आता पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे.
गेल्या 24 तासात कोरोनाचे 37 हजार 593 नवीन रुग्ण आढळून आले. तर 648 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 34 हजार 169 रुग्ण बरे होऊन घरे परतले आहेत. सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 3 लाख 22 हजार 327 इतकी आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 4 लाख 35 हजार 758 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनावर मात झालेल्यांची संख्या 3 कोटी 17 लाख 54 हजार 281 इतकी आहे.

Exit mobile version