| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जेष्ठ नागरिकांसाठी इन्कोव्हॅक लस महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रावरती उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इन्कोव्हॅक लसीकरण शनिवारपासून पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर सुरू करण्यात आले आहे.
ही लस नाकावाटे देण्यात येणार असून, 60 वर्षांवरील लाभार्थ्यांनी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लशीच्या दोन्ही मात्रा घेऊन सहा महिने झाले आहे अशा जेष्ठ नागरिकांनाच मिळणार असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आंनद गोसावी यांनी दिली आहे. या लसीसाठी पूर्वीप्रमाणेच आधी कोविन पवरती नोंदणीकरावी लागणार आहे. महानगरपालिकेच्या 9 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी 20 डोस व 4 आरोग्य वर्धिनी उपकेंद्रासाठी प्रत्येकी 10 डोस शासनाकडून पुरविण्यात आले आहे.