| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड-जंजिरा डोंगरी सुमा संस्थेतर्फे आयोजित कबड्डी स्पर्धेत अलिबाग येथील प्रिमियम ताडवागळे संघाने जय हनुमान डोंगरी, मुरुड-जंजिरा संघावर मात करीत चषकावर नाव कोरले. या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते विलास उर्फ भाई सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रुषिकांत डोंगरीकर, स्मिता खेडेकर, निलेश मयेकर, जयमाला विचारे, अजित कारभारी, मृदास तोंडलेकर, ग्रामस्थ डोंगरी सुमाचे अध्यक्ष मच्छिंद्र नाईक, मंगेश पुलेकर, उपाध्यक्ष संजय भोसले सचिव, जितेंद्र खेऊर खजिनदार तसेच रवींद्र नाईक, चंद्रशेखर उपे, संदीप नाईक, संदेश इपे, चेतन खेकर, सिद्धेश नाईक, नयन सतविडकर, साहिल खेऊर, विपिन खेऊर, शुभम भोसले उपस्थित होते. स्पर्धेच्या प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन, श्रीगणपती पूजन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
दरम्यान, जय हनुमान डोंगरी संघ व अलिबाग प्रिमियम ताडवागळे संघ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात ताडवागळे संघाने बाजी मारली. त्यांना रुपये 25000/- व चषक देऊन गौरविण्यात आले. तर, द्वितीय क्रमांकाचे रु.15,000 व चषक जय हनुमान डोंगरी, मुरुड-जंजिरा, तृतीय क्रमांक रु.7,000 व चषक वादळ खारिकवाडा नांदगाव तर चतुर्थ क्रमांक चिचमाता क्रीडा मंडळ बोर्लीपंचत संघाने मिळविला. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाचे पारितोषिक ताडवागळे संघाचा सौरभ पाटील याला, तर उत्कृष्ट चढाईसाठी वादळ खारीकवाडा संघाचा ओमकार मेस्त्री याला गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी किशोर माळी, चेतन माळी कुमार, आरकशी, मोहन वारगे यांनी समालोचक म्हणून भूमिका बजावली.