‘या’ महिन्यात लसीकरणाची गती वाढणार

केंद्र सरकारचे आयोजन – अमित शाह
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारपासून देशात लसीकरणाचा नवीन टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यात, 18 वर्षांवरील सर्व लोकांना विनामूल्य लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथून याचा शुभारंभ केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमधील पंडित दीन दयाल उपाध्याय केंद्रात लसीकरणाचा आढावा घेतला. अमित शहा म्हणाले की, एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना मोफत लस देणे हा मोठा निर्णय आहे. आज योग दिनानिमित्त याची सुरुवात देशभर सुरू आहे. आता आम्ही प्रत्येकाला लस देण्याच्या उद्दीष्ट्याकडे झपाट्याने पोहोचू.

भारत सरकारने जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आयोजन केले आहे. करोनापासून नागरिकांना वाचवण्यासाठी भारत सरकारच्या या निर्णयामुळे सर्वांना दिलासा मिळणार आहे. शाह यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की सर्व लोकांनी लसीकरण केलेच पाहिजे तसेच करोनावर मात करण्यासाठी दुसरी लस देखील वेळेवर घ्यावी.
अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

Exit mobile version