| पुणे | प्रतिनिधी |
जो येणार तो आमचाच आहे. ज्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. असे जाहीर करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील दोन्ही दरडींवर हात ठेवून बसलेल्यांना खुली ऑफरच देऊन टाकली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवड येथे सहकार विभागाच्या पोर्टलचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना अमित शाह म्हणाले की, मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. सहकार विभागाचे सचिव आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कमी वेळेमध्ये हा कायदा आमलात आणण्यासाठी कष्ट घेतले. 2 तारखेला कायदा तयार झाला आणि 4 तारखेला लागू झाला.असे त्यानी सांगितले.
सहकाराला गावागावात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सहकाराच्या ऑडिटची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलीय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, त्यांच्या मार्गदर्शनात सहकाराला वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम करणार आहोतफफ असा विश्वास शाह यांनी बोलून दाखवला.
मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह ॲक्टअंतर्गत निवडणूक व्यवस्थेमध्ये सुधार, को-ऑपरेटिव्ह गव्हर्नन्स, व्यापारी सुलभता आणि स्वतंत्र निवडणूक आयोग नेमण्यात आलेला आहे. आता कुणीही आपल्या पुतण्या-भावाला नोकरीला लावू शकणार नाही. बोर्ड चालवण्याच्या नियमांत मोठे बदल केला आहे.
अमित शाह, केंद्रीय मंत्री
दादा योग्य त्या ठिकाणी बसलात
मदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यादा पुण्यात आलो आहे. मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसलो आहे. मी पवार यांना सांगू इच्छीतो की खूप काळानंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात. तुमच्यासाठी हीच जागा योग्य होती, पण तुम्ही उशिर केलात,फ असं अमित शहा म्हणाले.
मपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह फक्त हे दोघेच देशाचं नेतृत्व करू शकतात. त्यामुळे मी मोठा निर्णय घेतला. शाह हे गुजरातमधून येतात. पण, त्यांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण, ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम होत असते. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे.
अजित पवार, उपमुख्यमंत्री
शाह भेटीचे वृत्त कपोकल्पित- जयंत पाटील
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आज पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याविषयी विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, एखाद्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू होणे योग्य नाही. काय झालं, काय नाही याचा अभ्यास बातमी देणाऱ्यांनी केला पाहिजे. पुढे बोलताना ते म्हणाले की, माझी सकाळपासून या बातम्यांमुळे करमणूक होतेय, मी इकडे गेलो, मी पुण्याला गेलो अशा…अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा, मी आणि अजून एकजण रात्री दीड वाजेपर्यंत इथेच बसलेलो होतो. मग मी कधी पुण्याला गेलो. सकाळी, काल संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी होतो. मग मी तिकडे कधी गेलो? मी त्यांना कधी भेटलो याचं संशोधन झालं पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले.