| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यातील मौजे रहाटाड येथील सरपंच मिताली करंजे,सदस्य नियती नागे, रुक्मिणी मालुसरे व मराठाआळी ग्रामस्थ राष्ट्रवादीत स्वगृही परतले असून त्यांनी खा. सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. रहाटाड मराठाआळी येथील ग्रामस्थांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी नाना भौड, कैलास पायगुडे,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, जान्हवी शिंदे, नागेश लोखंडे, जगदीश शिंदे यांसह राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.