कोरोनाबाधित रुग्ण घटू लागले

नवी दिल्ली | वृत्तसंस्थ |
देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, मृतांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 62 हजार 224 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 2 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 28,00,458 वॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर एकूण वॅक्सिनेशनचा आकडा 26,19,72,014 वर पोहोचला आहे.

Exit mobile version