आयपीएल २०२२ सामन्यांवर कोरोनाची टांगती तलवार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला नव्या कोविड -19 च्या व्हॅरिएंटसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिलाय. युरोपीय देशांसह दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला एका पत्राच्या माध्यमातून विशेष काळजी घेण्याची सूचना केली आहे. याचा परिणाम आयपीएल सामन्यांवर होऊ शकतो. राज्य सरकार प्रेक्षकांशिवाय बंद दाराआड सामने घेण्याचा निर्णय घेऊ शकतो, अशी चर्चाही सध्या रंगली आहे.

विधानसभेत पडसाद
आयपीएलच्या 15 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती मुंबईतील तीन स्टेडियमसह पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर रंगणार आहेत. या सामन्यावेळी स्टेडियममधील प्रेक्षक क्षमतेच्या 25 टक्के चाहत्यांना एन्ट्री दिली जाणार आहे. ही मर्यादा वाढवून स्टेडियम क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेनं प्रेक्षकांना प्रवेश द्यावा, अशी मागणी आ.आशिष शेलार यांनी विधानसभेत केलीये.
आयपीएलसाठी वानखेडे, ब्रेबॉन, डी.वाय पाटील या स्टेडियममध्ये 25 टक्के ऐवजी 50 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश द्यावा, असे ते म्हणाले आहेत. विधानसभेत मत्सव्यवसाय, क्रिडा, सार्वजनिक बांधकाम आणि सहकार या विषयावरील चर्चेवेळी त्यांना आयपीएल स्पर्धेसंदर्भात मुद्दा मांडला. मुंबईतील नियोजित सामान्यांसाठी स्टेडियमध्ये 25 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. यातील काही जागा शासनाला द्यावा लागत असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी अल्प तिकिटे उपलब्ध होतील. त्यामुळे एमसीएच्या वतीने याबबात क्षमता वाढवून देण्याची मागणी करण्यात येत असून राज्य सरकारने 25 टक्के ऐवजी 50 टक्के क्षमतेची परवानगी देण्याबाबत विचार करावा, असे ते म्हणाले.

Exit mobile version