| कर्जत | वार्ताहर |
कर्जत येथील दिवाणी न्यायालयामध्ये वकीली करणारे वकीलांची कर्जत अॅडव्होकेटस बार असोशिएशनतर्फे कर्जत उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कर्जत यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात वकील संरक्षण कायदा पारीत व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
बार असोशिएशनतर्फे कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे आणि तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांची भेट घेवुन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात दि. 25 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हयातील राहुरी तालुक्यामध्ये दिवाणी कोर्टामध्ये वकीली व्यवसाय करणारे अॅड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी अॅड. मनिषा आढाव यांचे अपहरण करुन त्यानंतर त्यांची निर्भुण हत्या करण्यात आली. सदरील घटना अतिशय गंभीर व निंदनिय आहे. सदरील घटनेचा कर्जत अॅडव्हाकेट बार असोशिएशनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येतो. अशा प्रकारच्या वकीलांवर हल्ले होण्याच्या घटना राज्यामध्ये वेळोवेळी होत आहेत. त्यामुळे वकील वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशाप्रकारे सतत होणार्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा पास करण्यासाठी आपले मार्फत सदरील निवेदन शासनापर्यंत पोहचवण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.