। कर्जत । वार्ताहर ।
सामाजिक कार्यकर्ते संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ कर्जत माहेश्वरी युवा मंडळाचे पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले. राष्ट्राच्या आणि राज्याच्या विकासास माहेश्वरी समाजाचे अमुल्य असे योगदान लाभले असे असताना माहेश्वरी समाजातील दानशुर व्यक्तींसह व्यापारी वर्गावर खुनी हल्ले करून त्यांच्यावर नाहक अत्याचार केला जात आहे. अशाचप्रकारे माहेश्वरी समाजातील नांदेड येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व तसेच प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची काल नांदेड येथे दिवसाढवळ्या गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणार्या आरोपींना तात्काळ अटक करुन जलदगती न्यायालयाद्वारे खटला चालवा. या मागणीसाठी कर्जत माहेश्वरी युवा मंडळातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे व कर्जत पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक सुवर्णा पत्की यांना निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी मंगला राठी, योगीता चांडक, अश्लेशा भुतडा, वनीता सोनी, योगेश राठी, गणेश डागा, रामेश्वर राठी, अमित चांडक, संदेश भुतडा, लक्ष्मीकांत सोनी, महेश सारडा, मयुर डागा, निलेश डागा, संदिप चांडक आदि कार्यकर्ते उपस्थित होते.