आपटा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार?

| आपटा | वार्ताहर |

आपटा ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता व काही कामात भ्रष्टाचार झाला आहे, अशा प्रकारच्या तक्रारी आपटा येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भोवड यांनी पनवेल पंचायत समिती व कोकण भवनात केली होती. त्या अनुषंगाने दि. 30 मे रोजी पंचायत समिती पनवेल यांनी श्री. घरत यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. याबाबतीत गुरुवारपासून चौकशी सुरू केली आहे व सर्व माहिती कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. पुढील कारवाई करताना कडक भूमिका घेतली जाईल, असे विस्तार अधिकारी श्री. घरत यांनी सांगितले. यावेळी आपटा सरपंच व सदस्य, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते सुभाष व दिलीप मोरे उपस्थित होते.

Exit mobile version