। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी हद्दीतील आपटा पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झालेली आहे. शिवसेनेकडून संतोष शिंगाडे यांनी यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केलेले आहेत.
या गणात बारापाडा कल्हे घेरावाडी, कोरळवाडी, दाभोळवाडी, गंगेचीवाडी, आपटा माडभोन, सोनारवाडी, बागेचीवाडी , टपोरावाडी गोविदाचीवाडी टोकाचीवाडी, तसेच सारसई धनगरवाडा ,कालीवली, चावणे, सवणे, जांबिवली, कराडे बुद्रुक, गायचरन,तुळशीमाळ,मोदीमाल, खुटलवाडी, पेरूचीवाडी, जांबिवली वाडी घेराकीला माणिकगड या गावांचा प्रमुख्याने सहभाग आहे. आपटा पंचायत समितीमध्ये आपटा,चावणे , जांभिवली तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.