26 गाव योजनेतील कामात भ्रष्टाचार: राजेंद्र मळेकर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रोहा तालुक्यात 40 वर्षापुर्वी धाटाव एमआयडीसी आली. एमआयडीसी आल्यानंतर नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे योग्य पाणी मिळावे, यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत 26 गाव पाणी योजना मंजूर झाली. परंतु, आजही 26 गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. दीड ते दोन किलो मीटर पायपीट करीत गावांतील महिला डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणत आहेत. पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.26 गाव योजनेचे काम सुरु झाले नाही. परंतु, ठेकेदाराने निम्मे बील काढले असा आरे खुर्द ग्रामपंचायीचे सरपंच राजेंद्र मळेकर यांनी केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून माहिती दिली जात नाही. पाईप असूनही ते टाकण्यात आले नाहीत. गावांमध्ये काम प्रलंबित आहे. करोडो रुपये येऊनही महिलांच्या समस्या तशाच आहेत. या योजेनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी. या प्रश्नाबाबत शेकाप आक्रमक असून आगामी काळात रोह्यात शेकापमार्फत तीव्र आंदोलन केले जाणार असा इशारा मळेकर यांनी दिला आहे.

Exit mobile version