30 ऑगस्टपासू स्पर्धेला प्रारंभ; 13 सामन्यांची वेळ निश्चित
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आशिया चषक स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरु झाले असून, या स्पर्धेला 30 ऑगस्टपासून होणार आहे. पाक आणि श्रीलंकेत होत असलेल्या या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरू होणार आहेत आणि रात्री 10.45 ते 11 पर्यंत चालण्याची शक्यता आहे. भारत आणि पाक यांनी अंतिम फेरी गाठली तर स्पर्धेत या दोन संघांत तीन सामने होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत एकूण 13 सामने खेळविले जाणार आहेत. यावेळी आशिया कप एकदिवसीय (50 षटकांच्या) स्वरूपात खेळवला जाईल. त्याचबरोबर सर्व सामन्यांच्या वेळाही समोर आल्या आहेत.
या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून त्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांचा समावेश आहे. सर्व संघांची 3-3 अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळला गट-अ मध्ये ठेवण्यात आले आहे. तर, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि गतविजेता श्रीलंका यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाईल, ज्यामध्ये ग्रुप स्टेज आणि सुपर-4 स्टेजचा समावेश असेल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस्वर पाहता येणार आहे.
वेळापत्रक
30 ऑगस्ट: पाकिस्तान वि. नेपाळ
31 ऑगस्ट: बांगलादेश वि. श्रीलंका
2 सप्टेंबर: भारत वि. पाकिस्तान
3 सप्टेंबर: बांगलादेश वि. अफगाणिस्तान
4 सप्टेंबर: भारत वि. नेपाळ
5 सप्टेंबर: अफगाणिस्तान वि. श्रीलंका
सुपर -4 प्लेऑफ
6 सप्टेंबर: ए 1 (भारत/ पाक/ नेपाळ) वि. बी 2 (श्रीलंका/ बांगलादेश/ अफगाणिस्तान)
9 सप्टेंबर: बी 1 (श्रीलंका/बांगलादेश/अफगाणिस्तान) वि. बी 2 (श्रीलंका/ बांगलादेश/ अफगाणिस्तान)
10 सप्टेंबर: ए1 (भारत/ पाक/ नेपाळ) वि. ए 2 (भारत/ पाक/ नेपाळ)
12 सप्टेंबर: ए 2 (भारत/ पाक/ नेपाळ ) वि. बी 1 (श्रीलंका/ बांगलादेश/अफगाणिस्तान)
14 सप्टेंबर: ए1 (भारत/ पाक/ नेपाळ) वि. बी 1 (श्रीलंका/ बांगलादेश/ अफगाणिस्तान)
15 सप्टेंबर: ए2 (भारत/ पाक/ नेपाळ) वि. बी2 (श्रीलंका/ बांगलादेश/ अफगाणिस्तान)
17 सप्टेंबर: अंतिम सामना (सुपर 4 मधील पहिले दोन संघ)