पेणमधील कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू

| पेण | प्रतिनिधी |

जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीची प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी पार पडली. मतदान प्रक्रिया सुरू असतानाच नागपुर खंडपिठाच्या आदेशानुसार राज्यातील थांबलेल्या इतर नगरपालिकेंच्या निवडणूकांमुळे 3 डिसेंबरचा निकाल 21 डिसेंबर पर्यत लांबणिवर गेला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. निकाल दुसऱ्या दिवशी मिळेल या खात्रीने उमेदवारांनी तयारीही केली होती. परंतु, आता निकालासाठी अजून काही दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार असल्याने सर्वच पातळीवर आकडेवारीचे गणित सूरू झाले आहे. कोणत्या भागत किती मते मिळू शकतील, कुणी साथ दिली, कुठे दगाफटका झाला. कोणता प्रभाग मजबूत किंवा कमजोर? याचा तपशीलवार अभ्यास, उमेदवार व कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. अनेक ठिकाणी विचारपूस, चर्चासत्रे व गटबैठका सुरू झाल्याचे चित्र शहरात दिसत आहे. पेणमध्य एकूण 12 प्रभागामधून 24 नगरसेवक निवडले जाणार होते. त्यामध्ये 6 नगरसेवक बिनविरोधी निवडूण आले आहेत. त्यातील 3 भाजप आणि 3 राष्ट्र वादी कॉग्रेसचे आहेत. मात्र, उर्वरित 18 नगरसेवकांसाठी लढत झाली असून नगराध्यक्षपदासाठी तीरंगी लढत आहे. त्यामुळे आता मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे तेव्हा कोणता पक्ष बाजी मारते, याकडे संपुर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version