देगलूर मतदारसंघात उद्या मतमोजणी

नांदेड | प्रतिनिधी |

देगलूर विधानसभा पोट निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. 2) देगलूर येथे होणार आहे.देगलूर विधानसभेचे तत्कालीन आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक घोषित झाली होती. यासाठी शनिवारी मतदान झाले होते. यात 64 टक्के मतदारांनी सहभाग घेतला. या निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार सुभाष साबणे आणि काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांच्यात चुरस झाली होती. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर आघाडीकडून देगलूर विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.

Exit mobile version