आंबेतमध्ये कांदळवनांची बेसुमार कत्तल

| आंबेत । प्रतिनिधी ।

म्हसळा तालुक्यातील आंबेत विचारेवाडी हद्दीतील सुमारे दीड हेक्टर जमिनीवर असणार्‍या गट नंबर 335 आणि 350 या जागेत मोठ्या पद्धतीने सावित्री खाडीच्या किनारपट्टी भागात अनेक कांदळवनांसह त्यांच्या अनेक प्रजातींची तोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जागा मालकावर अद्याप संबंधित विभाग कारवाई करत नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे. संबंधित जागा मालकाच्या या मक्तेदारीपणामुळे कांदळवनांची तोड म्हणजेच पर्यावरणाला घाला घालण्याचे काम हे व्यवसायिक करत आहेत असा आरोप मनसेचे रस्ते साधन सुविधा आस्थापना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अमित शिंदे यांनी केला आहे. महसूल विभाग आणि वनविभाग एवढी मोठी तोड होऊन देखील संबंधित जागा मालकाला पाठीशी घालत आहेत का असा आरोप देखील मनसेचे रस्ते आस्थापनाचे रायगड जिल्हा सचिव शेखर सावंत यांनी केला आहे.

आंबेत हद्दीतील सावित्री खाडीच्या किनारपट्टी भागात गट नंबर 335 आणि 350 या मालकी क्षेत्र असलेल्या जागेत झालेल्या कांदळवन कत्तल प्रकरणी आम्हाला सुरुवातीला ते क्षेत्र कोणत्या स्वरूपात आहे हे मुळात माहीत नसल्या कारणाने आम्ही त्या जागेत मिळालेल्या माहिती प्रमाणे पंचनामे केले त्यानंतर हे क्षेत्र मालकी जागेत असल्याचे निदर्शनात येताच याची पुढील कारवाईची बाजू प्रांत आणि कलेक्टर यांना असल्याने ते यासंदर्भात योग्य निर्णय घेतील.

संजय पांढरकामे – वनक्षेत्रपाल म्हसळा वनविभाग

सर्कल यांना चौकशी साठी पाठवलं असता संबंधित जागेत नेमके कोणत्या क्षेत्रात तोड झाली हे अद्याप लक्षात येत नसून खाजगी क्षेत्रातील या कांदळवन प्रजातींच्या तोडीत टी एल आर, वनविभाग आणि महसूल यांच्या माध्यमातून रिपोर्ट बनवले आहेत ते रिपोर्ट एकत्र तपासून झाले की त्यासंदर्भात जो अहवाल येईल तो रिपोर्ट हाती आल्यावर ते प्रांताधिकारी यांना सादर केले जातील मुळात खाजगी क्षेत्रातील जागा मालकाने यासंदर्भात सांगितलं नसल्याने यासाठी वेळ लागला मात्र यासंदर्भात लवकरच अहवाल सादर होईल

समीर घारे तहसीलदार म्हसळा

मुळात कांदळवन क्षेत्रात वनांची कत्तल करणे म्हणजेच वन अधिनियम कायदा 1986 नुसार कायद्याने गुन्हा आहे मात्र आंबेत विचारेवाडी हद्दीत काही जागा मालक व्यवसायिक राजरोसपणे या कांदळ वनांची कत्तल करत आहेत त्यामुळे अशा व्यवसायिकांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मनसे स्टाईलने याचे उत्तर देऊ

अमित शिंदे- उपाध्यक्ष रस्ते साधन सुविधा व आस्थापना महाराष्ट्र राज्य, आंबेत
Exit mobile version