| उरण | वार्ताहर |
उरणमधील सर्वसामान्य रिक्षाचालकाचे अनोखे असे देशप्रेम उरणकरांना दरवर्षी पहायला मिळत आहे. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट व 26 जानेवारी प्रजासत्ताक या दोन दिवशी उरणमधील रिक्षाचालक एजाज सौदागर हे आपल्या रिक्षाला तिरंगा ध्वजासारखी सजवून, रिक्षात देशपर गीते लावून आपले देशावरील प्रेम व्यक्त करतात.
उरणध्ये स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी एजाज सौदागर यांची तिरंगा ध्वजात सजलेली रिक्षा व देशगीते ऐकायला मिळाली नाहीतर उरणकरांना चुकल्यासारखे वाटते. वरील दोन दिवशी न चुकता एजाज सौदागर हा आपला देशावरील प्रेम आपल्या परीने व्यक्त करीत असला तरी देशप्रेमींना ते भावणारे आहे. एजाज यांच्या देशप्रेमाची चर्चा उरणच्या जनतेत लहानांपासून थोरांपर्यंत होताना दिसत आहे.
उरणमधील रिक्षाचालकाचे देशप्रेम
