देशी बनावटीचा सिंगल बोअर, काडतुसे जप्त

। रसायनी । राकेश खराडे ।

चौक गावच्या हद्दिंतील मुंबई-पुणे रस्त्यालगत असलेल्या हॉटेल तेजस पार्किंगजवळून पेट्रोलींग करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार राजेश पाटील यांना माहिती मिळताच रिस येथील सौरभ जगदिश प्रसाद (23) याला मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई सहाय्यक फौजदार राजेश पाटील, संदिप पाटील, यशवंत झेमसे, रविंद्र मुंढे, विकास खैरनार, सचिन शेलार, भरत तांदळे, सचिन वावेकर यांच्या पथकाने केली. यात 35 हजार रूपये किमतीचा एक देशी बनावटीचा शिंगल बोअरचा कट्टा 1 हजार रूपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस असा एकूण 36000 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

Exit mobile version