| नेरळ । वार्ताहर ।
नेरळ बाजारपेठेतून अज्ञात चोरांनी एका महिलेची पर्स चोरून नेल्याची घटना घडली. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत नेरळ बाजारपेठेतील दुकानात भाजी खरेदी करत असताना शिवाजी चौक येथे फिर्यादी रा.नेरळ इस्ट ता.कर्जत या ठिकाणी नेरळ बाजारपेठेत शिवाजी चौक येथे भाजी खरेदी करत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने एकूण 7 हजार रूपये किमतीचा मोबाईल तसेच पर्स व त्यामध्ये असलेली रोख रक्कम एक हजार रूपये असा एकूण 8 हजार रूपये किमतीचा माल व चाव्या चोरून नेल्या. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.