पनवेल मधील रस्त्यावरील बेघर, निराधार व्यक्तींचे कोव्हीड लसीकरण

पनवेल | प्रतिनिधी |

कोणताही शासकीय पुरावा, आधार कार्ड नसलेल्या ९० बेघरांचे लसीकरण पनवेल कार्यक्षेत्रातील चारही प्रभागामधील नागरी प्राथमिक आरेाग्य केंद्रामध्ये 23 जुलै ला ९० बेघर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ज्यांच्याकडे कोणताही शासकिय पुरावा नाही, आधार कार्ड नाही अशा रस्ते, उड्डाणपुलाखालील जागा येथे आढळणा-या निराधार -बेघर व्यक्ती, असे दुर्लक्षित घटक लसीकरणापासून वंचित राहू नयेत याकडे पनवेल महानगरपालिका लक्ष देत आहे.

कोरोनाच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर टेस्टींग आणि लसीकरणावर पनेवल महानगरपालिका भर देत आहे. लसींच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिका क्षेत्रातील निराधार – बेघरांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाला सुरूवात करण्याआधी या नागरिकांना जेवण देण्यात आले व नंतर कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आले.

Exit mobile version