पनवेलमध्ये कोव्हिड योद्धाचा सत्कार

। पनवेल । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगर पालिकेतील स्वीकृत नगरसेवक शंकरशेठ म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि.3) विठ्ठल रखुमाई मंदिर कामोठे येथे कोव्हिड काळात जीवाची पर्वा न करता स्थानिक नागरिकांची सेवा करणारे डॉक्टर, सफाई कामगार, अत्यावशक सेवेतील कर्मचारी आदींचा सत्कार कोकण शिक्षण विभागाचे आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या आणि सुश्रुषा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नारायणशेठ घरत, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेवक रविंद्र भगत, गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version