कोविशिल्ड लसीचा कळाबाजार करणाऱ्याला अटक

I पनवेल I साहिल रेळेकर I

सध्या देशभरामध्ये कोविड-१९  या विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असतानाच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून नागरिक देखील तत्परतेने लसीकरणासाठी उत्साह दाखवत आहेत. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी  देशभरामध्ये  लसीकरण मोहीम राबवली जात आहे. असे असताना या गोष्टीचा गैरफायदा घेऊन काहीजण कोविड-१९ वर मिळणारी कोविशिल्ड या लसीचा काळाबाजार करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. शेखर पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त प्रवीण पाटील यांनी याविषयी गैरकृत्य करणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. 

या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष-२ चे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार किशोर कुमार खेत, रा.ठी. कामोठे, हा नेरुळ येथील राजीव गांधी ब्रिज सेक्टर ८, येथे कोविशिल्ड लस बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्याकरिता विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाली.

त्या दरम्यान पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरिधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली औषध निरीक्षक अजय माहुले यांच्यासह त्याठिकाणी सापळा रचला. या गुन्ह्यातील आरोपी हा बोगस गि-हाईकास कोविशिल्ड लसीचे १५ डोस असे एकूण ६० हजार रुपयांना विक्रि करीत असताना एकूण दोन व्हाईल्स सह मिळून आला. सदर इसमाला त्याब्यात घेवून औषध निरीक्षक अजय माहुले यांच्या तक्रारीवरून नेरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून आरोपी किशोर कुमार खेत (वय २१) याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष२ हे करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे, पाटील, स.पो.उपनि. साळुंखे, पो.ह.अनिल पाटील, सचिन पवार, सचिन म्हात्रे, सुनील कुदले, संजय पाटील, इंद्रजित कानू, वाघ, काटकर, प्रफूल मोरे, गडगे, सूर्यवंशी,भोपी यांनी केली आहे.

मागील एक ते दीड वर्षापासून देशभरात कोविड-१९ महामारीचा संसर्ग सुरू असून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि नागरिक कसोशीने प्रयत्न करीत आहेत. परंतु असे असताना नागरिकांच्या असह्यतेचा गैरफायदा काही समाजकंटक घेत असून त्यांच्याकडून बेकायदेशीर गैरकृत्य होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ.शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त प्रवीण पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिकलक्षक गिरीधर गोरे व त्यांच्या पथकाने रेमेडेसिव्हरचा काळाबाजर करणारे व आर.टी.पी.सी.आर.चा बनावट रिपोर्ट तयार करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

Exit mobile version