। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जंगल भागात चरण्यासाठी गेलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये गाय जखमी झाली आहे. मात्र आपले प्राण वाचत ती गावात परतली आहे. जखमी अवस्थेतील गाय पाहून पुन्हा एकदा तालुक्यातील विन्हे गावाच्या परिसरातील बिबट्याच्या वावरावर शिकामोर्तब झाले असल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. परिसरासभोवती होत असलेल्या जंगली हिंस्र श्वापदांच्या उपद्रवाने स्थानिक मेटाकुटीला आले आहेत.