भायदे यांना गाय-वासरु प्रधान

Exif_JPEG_420

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड-भोगेश्‍वर पाखाडीमधील दुग्धव्यवसाय करणारे जयकांत (जया) भायदे यांच्या मालकीच्या दुध देणार्‍या चार म्हैशी व एका गायीला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुरूडच्या हलगर्जीपणामुळे थ्रीपेज लाईनाचा तारेला शॉक लागून त्यांचा जागीच मुत्यू झाला. यामुळे भायदे कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उद्भवत असल्याने शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सहा लिटर दुध देणारी गाय व वासरू त्यांना प्रदान करण्यात आली. यावेळी आदेश दांडेकर, विजय वाणी, प्रमोद भायदे, प्रशांत कासेकर, बाळकृष्ण गोंजी, गणेश मसाल, मुग्धा जोशी, चंद्रकांत अपराध, अमित गोजी, विशाल विरुकुड, आप्पा विरुकुड, अविनाश दांडेकर, तेजस भायदे, यश माळी, निजामुद्दीन हादादी, अभिजित विरुकुड, उत्कृषा धोत्रे, माई सुभेदार, रुपेश जामकर, दिपाली जामकर आदिंसह उबाठा पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version