भिसेगांवमध्ये गाईचा वाढदिवस

| नेरळ | प्रतिनिधी |
भिसेगांव येथील मयुरेश चौधरी यांच्या घरातील गायीचा दहावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मयुरेश या प्राणी मित्राला जनावरे पाळण्याची मोठी हौस.त्यामुळे त्यांच्या घरी ज्यावेळी गायीचे आगमन झाल तेव्हा तिचे नाव गौरी ठेवले.सहसा जनावरे गोठ्यात असतात,मात्र गौरी गाय ही चौधरी कुटुंबाच्या सर्वांच्या समोर असते.गेली दहा वर्षे ते नियमिपणे या गायीचा वाढदिवस उत्साहात साजरा करतात. यावर्षी गौरी गायीचा दहावा वाढदिवस असल्याने भिसेगाव मधील चौधरी कुटुंबांच्या दारासमोर भाला मोठा मांडव उभारला होता. या सोहळ्यानिमित्त भजन, संध्या तसेच गोवर्धन क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार असे कार्यक्रम आयोजित केले होते.

Exit mobile version