हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे क्रॅश लँडिग

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पूर्व अरुणाचल प्रदेशमध्ये इंडियन एअर फोर्सच्या एमआय 17 हेलिकॉप्टरचं क्रॅश लँडिंग झालं. सुदैवाने यात जिवीतहानी झालेली नाही. दोन वैमानिकांसह तीन क्रू सदस्य या हॅलिकॉप्टरमध्ये होते. त्यांना कुठलीही इजा झालेली नाही, ते सुरक्षित आहेत. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात पटनीटॉप टुरिस्ट रिसॉर्टजवळ शिव गड धर भागात लष्कराच्या हेलिकॉप्टरचे क्रॅश लँडिंग झाले होते. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version